Pune | Mon, 06 April 2026

Ad

मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी निवड चाचण्या जाहीर

Sunil Goyal | 17 views
मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी निवड चाचण्या जाहीर

मुंबई २६ : महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयामार्फत ‘मिशन लक्ष्यवेध’अंतर्गत मुंबई विभागीय क्रीडा निपुणता केंद्रासाठी खेळाडूंची निवड प्रक्रिया जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश राज्यातील गुणवंत खेळाडूंना उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी घडवणे हा आहे.

या उपक्रमांतर्गत वेटलिफ्टिंग, लॉन टेनिस, शूटिंग व टेबल टेनिस या क्रीडा प्रकारांसाठी विभागीय स्तरावर निवड चाचण्या आयोजित करण्यात आल्या आहेत. निवड प्रक्रियेदरम्यान तज्ञ प्रशिक्षकांमार्फत खेळाडूंचे कौशल्य परीक्षण करण्यात येणार असून निवड झालेल्या खेळाडूंना प्रगत प्रशिक्षण व करिअर मार्गदर्शन दिले जाणार आहे.

निवड चाचणी तपशील पुढीलप्रमाणे :

१) वेटलिफ्टिंग

ठिकाण : तालुका क्रीडा संकुल, कोपरी, ठाणे

संपर्क प्रमुख : श्रीमती हिमानी परब

मोबाईल : ८३६९७१६०४६

दिनांक : ०६ एप्रिल २०२६ |  वेळ : सकाळी ८.०० वा.

२) लॉन टेनिस

ठिकाण : महाराष्ट्र स्टेट लॉन टेनिस असोसिएशन, कुपरेज क्लब, मुंबई

संपर्क प्रमुख : श्रीमती प्रीती टेमघरे

मोबाईल : ९०२९२५०२६८

दिनांक : ०७ एप्रिल २०२६ |  वेळ : सकाळी ८.०० वा.

३) शूटिंग

ठिकाण : कामगार कल्याण मंडळ, दादर, मुंबई

संपर्क प्रमुख : श्रीमती नेहा साप्ते

मोबाईल : ९९६९९७२०२२

दिनांक : ०८ एप्रिल २०२६ | वेळ : सकाळी ८.०० वा.

४) टेबल टेनिस

ठिकाण : नवी मुंबई स्पोर्ट्स अँड सामाजिक विकास मंडळ, पनवेल

संपर्क प्रमुख : श्री. नीलकंठ आखाडे

मोबाईल : ९९६७२७७०८२

दिनांक : ०९ एप्रिल २०२६ |  वेळ : सकाळी ८.०० वा.

या निवड चाचण्यांसाठी २५ वर्षांखालील खेळाडू पात्र असून, राज्यस्तर व राष्ट्रीय स्तरावर सहभाग घेतलेला अनुभव आवश्यक आहे.

इच्छुक खेळाडूंनी आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करावा.

ई-मेल : missionlakshvedhamumdiv@gmail.com

अर्ज लिंक : https://forms.gle/2f7ypkikdUBKNf7fA⁠

अर्ज करण्याची अंतिम तारीख : ३१ मार्च २०२६

अर्जासोबत जन्मदाखला, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, क्रीडा कामगिरीचे प्रमाणपत्र, बोनाफाईड सर्टिफिकेट व पालक संमतीपत्र जोडणे आवश्यक आहे. निवड चाचणीच्या दिवशी मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी, मुंबई शहर यांच्या कार्यालयामार्फत देण्यात आली आहे.

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp