Pune | Sun, 15 February 2026

Ad

नोंदणी व मुद्रांक विभागात ‘गट-ड’ संवर्गातील उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध

Sunil Goyal | 3 views
नोंदणी व मुद्रांक विभागात ‘गट-ड’ संवर्गातील उमेदवारांची निवड यादी प्रसिद्ध

मुंबई, दि. ११ : नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ पदे भरतीकरिता आय. बी. पी. एस. कंपनीमार्फत जुलै-२०२५ मध्ये ऑनलाईन परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना नियुक्तीच्या अनुषंगाने समुपदेशनाकरीता बोलाविण्यात येणार आहे. याबाबत विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/  या संकेतस्थळावर स्थळ व दिनांक लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक रवींद्र बिनवडे यांनी कळविले आहे.

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गासाठीच्या परीक्षेचा निकाल दि. २० ऑगस्ट २०२५ रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांमधून सामाजिक व समांतर आरक्षणानुसार आणि गुणवत्तेनुसार उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या कागदपत्र पडताळणीअंती निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या संकेतस्थळावर दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचे विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

000

बी.सी.झंवर/विसंअ

 

 

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp