Pune | Tue, 17 March 2026

Ad

फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

Sunil Goyal | 3 views
फिनलंडचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली भेट

मुंबई, दि. ६ : फिनलंडचे देशाचे राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हॉटेल ताज पॅलेस येथे भेट घेतली.

या भेटी दरम्यान फिनलंडसोबत राज्याचे द्विपक्षीय संबंध, गुंतवणुकीच्या संधी, उद्योग, व्यापार, कौशल्य विकास आदि विषयी चर्चा करण्यात आली.

यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, कौशल्य विकास विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा वर्मा, उद्योग विभागाचे सचिव पी अन्बळगण, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, मुख्य राजशिष्टाचार अधिकारी राजेश गवांदे आदी उपस्थित होते.

०००

निलेश तायडे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp