Pune | Mon, 16 February 2026

Ad

राजभवन येथे पं.दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली

Sunil Goyal | 5 views
राजभवन येथे पं.दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली

मुंबई, दि. २५ : एकात्म मानवतावादाचे उद्गाते पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त राजभवन येथे पं. दीनदयाळ उपाध्याय यांना आदरांजली वाहण्यात आली.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांनी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी राज्यपालांचे परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, राज्यपालांचे परिसहायक अभयसिंह देशमुख तसेच राजभवनातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

दिनांक २५ सप्टेंबर ही पं.दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती ‘अंत्योदय दिवस’ म्हणून साजरी करण्यात येते.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp