
पुणे, दि. १६: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्याचा गौरव म्हणून विधानपरिषद आणि विधानसभेचे स्मृतीपत्र तसेच तामिळनाडू विधानसभा शोक प्रस्तावाची प्रत उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडे प्रशासनाच्यावतीने आज बारामती येथे सुपूर्द करण्यात आली.यावेळी उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे आणि अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी स्मृती पत्राचे तसेच तहसीलदार स्वप्नील रावडे यांनी शोक प्रस्तावाचे वाचन केले.
यावेळी बारामती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय पोलीस अधिकारी चैतन्य कदम, दौंडचे उप विभागीय पोलीस अधिकारी बापूराव तडस, गट विकास अधिकारी किशोर माने आदी उपस्थित होते.
००००
