Pune | Sun, 12 April 2026

Ad

राजधानीत महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

Sunil Goyal | 4 views
राजधानीत महात्मा ज्योतिराव फुले यांना जयंतीनिमित्त अभिवादन

नवी दिल्ली, दि. ११ : थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त आज राजधानीत त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. महाराष्ट्र सदनाच्या प्रांगणातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी महाराष्ट्र सदनाच्या विशेष आयुक्त श्वेता सिंघल, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp