
नवी दिल्ली, २३: भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाचे योगदान देणारे क्रांतीकारक शहीद भगतसिंग, सुखदेव आणि राजगुरू यांना शहीद दिनानिमित्त आज राजधानीत अभिवादन करण्यात आले.
कोपरनिकस मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी शहीदांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे आणि महाराष्ट्र सदनाचे व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
यावेळी व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी शहीद भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्या अतुलनीय शौर्याचा आणि त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी दिलेल्या सर्वोच्च बलिदानाचा परिचय करून दिला.
0000
