मुंबई, दि. २: राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीदिनी विधानभवन येथे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (४) शिवदर्शन साठे, उपसभापती यांचे खासगी सचिव अविनाश रणखांब, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे उपसचिव विजय कोमटवार, वि.स. पागे संसदीय प्रशिक्षण केंद्राचे संचालक आणि जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
०००