Pune | Sun, 15 February 2026

Ad

सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

Sunil Goyal | 8 views
सहकारी संस्थांच्या नोंदणीसाठी सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

मुंबई, दि. १० : मौजे नाहुली, सांगवी, चौंडी,आपटी (ता. जामखेड) येथील सहकारी संस्थांचे जिल्हा सहकारी बँकेत खाते उघडणे व सहकार विभागाकडे नोंदणी या संदर्भातील आमदार प्रवीण दरेकर यांच्या लक्षवेधी सूचनेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात घेण्यात आली.

या बैठकीस आमदार प्रवीण दरेकर तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान सहकारी संस्थांच्या नोंदणी प्रक्रियेतील तांत्रिक बाबींचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

येत्या चार दिवसांत सर्व तांत्रिक बाबींचे निराकरण करून या संस्थांची नोंदणी पूर्ण करावी, तसेच संबंधित विभागांनी समन्वय साधून कार्यवाही गतीने पूर्ण करावी, असे सभापती प्रा. शिंदे यांनी यावेळी सांगितले.

०००

मोहिनी राणे/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp