Pune | Mon, 06 April 2026

Ad

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे पुणे विमानतळावर स्वागत

Sunil Goyal | 10 views
उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे पुणे विमानतळावर स्वागत

पुणे, दि. २२ (जिमाका वृत्तसेवा) – भारताचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे आज पुणे विमानतळ येथे आगमन झाले. राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी उपराष्ट्रपती यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनीही उपराष्ट्रपतींचे स्वागत केले.

यावेळी राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते.

००००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp