Pune | Mon, 06 April 2026

Ad

वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

Sunil Goyal | 13 views
वारणा धरणग्रस्तांना शेतीयोग्य जमिनींचे वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करावी – मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील

मुंबई, दि. २३ : वारणा धरणग्रस्तांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार करून शेतीयोग्य असणाऱ्या जमिनींचे लवकरात लवकर धरणग्रस्तांना वाटप करण्यासंदर्भातील कार्यवाही करण्यात यावी, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले.

वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्त यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत आयोजित बैठकीत मंत्री श्री. जाधव-पाटील बोलत होते. बैठकीस आमदार जयंत पाटील, उपसचिव संजय इंगळे, सांगली जिल्हा पुनर्वसन अधिकारी रघुनाथ पोते यांच्यासह वारणा धरणग्रस्त आदी उपस्थित होते. पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, सांगली जिल्हाधिकारी अशोक काकडे, सांगली उपवनसंरक्षक गवते, प्रांताधिकारी श्रीनिवास अर्जुन दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

वारणा धरणग्रस्तांना देण्यात आलेल्या वर्ग २ च्या जमिनी वर्ग १ करण्याबाबत वित्त विभागाशी चर्चा करून त्यांचा अभिप्राय घेऊन फेरविचार करणे आवश्यक आहे, त्यानंतर त्यासंदर्भात योग्य ते धोरण तयार करता येईल. असेही मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी सांगितले.

आमदार जयंत पाटील यांनी वारणा धरणग्रस्तांना शासनाने दिलेल्या वर्ग २ जमिनी आहेत, त्या सरसकटपणे वर्ग १ मध्ये रुपांतरित करण्यात याव्या, अशी मागणी केली.

यावेळी पुणे विभागीय आयुक्त व सांगली जिल्हाधिकारी यांना शिल्लक जमिनीपैकी वाटपयोग्य जमिनीचे तत्काळ वाटप सुरू करण्यासंदर्भा तील कार्यवाही करण्याचे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिले. चांदोली अभयारण्यग्रस्तंबाबत सांगली उपवनसंरक्षक यांनी वस्तुस्थिती मांडली.

वारणा धरणग्रस्त व चांदोली अभयारण्यग्रस्त यांच्या सर्व प्रलंबित मागण्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल, असे म्हणत मंत्री मकरंद जाधव पाटील सांगितले.

0000

अर्चना देशमुख/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp