Pune | Thu, 16 April 2026

Ad

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

Sunil Goyal | 1 views
वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

मुंबई :दि १६. : राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांच्या बांधकामांचा आढावा  वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी  घेतला .

या बैठकीत वाशिम, अमरावती आणि धाराशिव येथील प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास नियमानुसार परवानगी देण्यात  आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात करण्यात यावी. अमरावतीतील प्रकल्पाबाबत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात कंत्राटदार निवडून बांधकामास गती दिली जाणार आहे. धाराशिव येथील प्रकल्पासाठी कंत्राटदार नियुक्तीच्या दृष्टीने निविदा उघडण्यात आली असून सध्या तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत, दर्जेदार बांधकाम आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी ही महाविद्यालये महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीस आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे  संबंधित अधिकारी उपस्थित होते तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

000000

दत्तात्रय कोकरे/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp