Pune | Mon, 06 April 2026

Ad

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

Sunil Goyal | 12 views
विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित; पुढील अधिवेशन २२ जून रोजी मुंबईत

मुंबई, दि. २५ : विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले. पुढील अधिवेशन २२ जून २०२६ रोजी मुंबई येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत सभापती प्रा.राम शिंदे यांनी तर विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

विधानपरिषदेत प्रत्यक्षात १४३ तास  ५१ मिनिटे कामकाज

विधान परिषदेत १४३ तास ५१ मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज ७ तास ११ मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती ८३.५४ टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही ७३.७५ टक्के इतकी होती.

विधानपरिषदेत ५ विधेयके पूर:स्थापित करण्यात आली तर ४ संमत करण्यात आली. विधानसभेने पारित केलेली १९ विधेयके विधानपरिषदेत संमत करण्यात आली. तर ४ विधेयके शिफारशींशिवाय विधानसभेकडे परत पाठविण्यात आली.  सभागृहात नियम ९७ अन्वये एकूण प्राप्त सूचना ५४, तर ५३ सूचना मान्य करण्यात येऊन त्यावर चर्चा झाली. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल सभापती राम शिंदे यांनी सर्वांचे आभार मानले.

विधानसभे 197 तास 44 मिनिटे कामकाज 

विधानसभेत 197 तास 44 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 53 मिनिटे झाले. या अधिवेशनात सभागृहात सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती  86.53 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 78.84 टक्के इतकी होती.

विधानसभेत 22 विधेयके पूर:स्थापित करण्यात आली आणि 22 संमत करण्यात आली. विधानपरिषदेने संमत केलेल्या विधेयकांची संख्या 4 होती. सभागृहात नियम 293 अन्वये एकूण 7 प्रस्ताव चर्चेला आले. या अधिवेशनात सहकार्य केल्याबद्दल अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर यांनी सर्वांचे आभार मानले.

0000

बी.सी.झंवर/विसंअ

 

महाराष्ट्र विधानमंडळाचे सन २०२६ चे अर्थसंकल्पीय अधिवेशन विधेयकांची माहिती

दोन्ही सभागृहात संमत: २७

मागे घेण्यात आलेली विधेयके :०१

विधानसभेत प्रलंबित विधेयक:००

विधान परिषदेत प्रलंबित:०१

एकूण:२९

 

दोन्ही सभागृहात संमत:२७:

१.महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२६

(सन २०२५ चा अध्यादेश क्रं. १३ याचे रूपांतरीत विधेयक) (नगरविकास विभाग)

२.         महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

३.         महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत (सुधारणा व विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०२६  (वित्त विभाग)

४.        महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२५ चा अध्यादेश क्रं.  १४ याचे रूपांतरीत विधेयक) (ग्रामविकास विभाग)

५.         महाराष्ट्र कारागृहे व सुधारसेवा विधेयक, २०२५ (गृह विभाग)

६.         महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२६ (सन २०२६ चा अध्यादेश क्रं.  १ याचे रूपांतरीत विधेयक) (उच्च व तंत्र शिक्षण)

७.        महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसूल व वन विभाग)

८.         महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क यांचे विनियमन) विधेयक, २०२६ (उच्च व तंत्र शिक्षण)

९.         महाराष्ट्र खाजगी विद्यापीठ (सुधारणा) विधेयक २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

१०.       महाराष्ट्र उद्वाहक, सरकते जिने व सरकते मार्ग (सुधारणा) विधेयक, २०२६ (उद्योग, उर्जा, कामगार व खनिकर्म विभाग)

११.       भागीदारी (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२६ (विधि व न्याय विभाग)

१२.       महाराष्ट्र विनियोजन विधेयक, २०२६ (वित्त विभाग)

१३.       महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक, २०२६ (गृह विभाग)

१४.      महाराष्ट्र मुद्रांक (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसूल व वन विभाग)

१५.       महाराष्ट्र स्वयंअर्थसहाय्यित शाळा (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२६ (शालेय शिक्षण विभाग)

१६.       महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२६ (उच्च व तंत्रशिक्षण विभाग)

१७.      महाराष्ट्र मोटार वाहन कर (सुधारणा) विधेयक, २०२६ (गृह विभाग)

१८.       महाराष्ट्र मुद्रांक (दुसरी  सुधारणा) विधेयक, २०२६ (महसूल व वन विभाग)

१९.       वन्य जीव (संरक्षण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२६ (महसूल व वन विभाग)

२०.       महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२६ (ग्रामविकास विभाग)

२१.       महाराष्ट्र निरसन विधेयक, २०२६ (सामान्य प्रशासन विभाग)

२२.       महाराष्ट्र खाजगी कौशल्य विद्यापीठे (स्थापना व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२६ (कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग)

२३.       भारतीय न्याय संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२६  (गृह विभाग)

२४.      महाराष्ट्र जमीन महसूल संहिता (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२६(महसूल व वन विभाग)

२५.      महाराष्ट्र कूळवहिवाट व शेतजमीन, हैद्राबाद, कुळवहिवाट व शेतजमीन आणि महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन (विदर्भ प्रदेश) (सुधारणा) विधेयक, २०२६ (महसूल व वन विभाग)

२६. महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, २०२६ (सहकार विभाग)

२७.      मुंबई महानगरपालिका (भूतलक्षी प्रभावाने सुधारणा, भांडवली मुल्यविषयक नियमांचे पुनर्अधिनियमन आणि विधिग्राह्यीकरण) विधेयक, २०२६. (नगरविकास विभाग)

 

मागे घेण्यात आलेली विधेयके:१

१.         महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशर्तीचे विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२५ (उद्योग, ऊर्जा कामगार व खनिकर्म विभाग)

 

विधानसभेत प्रलंबित विधेयके : निरंक:

 

विधान परिषदेत प्रलंबित विधेयके:१

१.         भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, २०२६ (गृह विभाग)

0000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp