Pune | Mon, 06 April 2026

Ad

वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

Sunil Goyal | 5 views
वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद

निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन

मुंबई, दि. २७ : वंदे मातरम् गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत विशेष टप्पा – 3 अंतर्गत जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा परिषद, मुंबई शहर आयोजित मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यामध्ये मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा (मुंबई शहर), आदर्श नगरसेवक समितीचे बाल विकास मंदिर, मराठी माध्यमिक शाळा, वरळी आणि डॉ. आंबेडकर महाविद्यालय, वडाळा येथील एनसीसीचे विद्यार्थी तसेच मुंबई शहरातील अनेक खेळाडूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

मुंबई शारीरिक शिक्षण मंडळाचे शारीरिक शिक्षण महाविद्यालय, वडाळा येथील प्रभारी प्राचार्य प्रा. डॉ. जे. एम. होटकर यांच्या हस्ते मॅरेथॉनला झेंडा दाखवून सुरुवात करण्यात आली. बीपीसीए महाविद्यालय वडाळा-नायगाव क्रॅास रोड-नॅशनल मार्केट सिग्नल-वडाळा स्टेशन- बीपीसीए महाविद्यालय वडाळा असा मॅरेथॉनचा मार्ग होता.

मॅरेथॉन स्पर्धा जिल्हा क्रीडा अधिकारी नीलिमा अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली. या उपक्रमासाठी क्रीडा कार्यकारी अधिकारी साहिल उतेकर, समृद्धी देवळेकर, क्रीडा अधिकारी अनिल घुगे, नेहा साप्ते, तसेच क्रीडा मार्गदर्शक फुलचंद कराड, अक्षय थोरात, प्रा. डॉ. नितू जोशी, प्रा.डॉ. रोहिणी कवडे, प्रा.डॉ. कैलास असाई, डॉ. किशोर मारू, डॉ. सुषमा चुगुळे, डॉ. राजेंद्र शेळके, डॉ. राजेंद्र धाकणे, कीडवाई नगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तावडे, भोईवाडा वाहतूक पोलीस स्टेशनचे सरदार नाळे उपस्थित होते.

वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायन

या कार्यक्रमांतर्गत बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयात ‘वंदे मातरम’ गीताचे सामूहिक गायन करण्यात आले. यावेळी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ए विभाग कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच मुंबई शहर जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालयात वंदे मातरम् गीताचे सामूहिक गायनाचे आयोजन करण्यात आले, यावेळी अपर  जिल्हाधिकारी बप्पासाहेब थोरात, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती शिवनंदा लंगडापूरे आणि वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी उपस्‍थित होते.

निबंध स्पर्धेचे यशस्वी आयोजन

वंदे मातरम् गीताच्या 150 व्या वर्धापन दिनानिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये निबंध स्पर्धेचे नुकतेच यशस्वी आयोजन करण्यात आले. या स्पर्धा 240 शाळांमध्ये घेण्यात आल्या. या स्पर्धेत 11,697 विद्यार्थी सहभागी झाले होते.

000

गजानन पाटील/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp