Pune | Mon, 16 March 2026

Ad

व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू

Sunil Goyal | 6 views
व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाण नियमित प्रमाणे सुरू

मुंबई, दि. ७ : आखाती देशातील युद्ध सदृश परिस्थितीमुळे मागील काही दिवस प्रलंबित झालेली विमान सेवा व विमान उड्डाण सुरू झाली आहेत.व्यावसायिक प्रवासी विमान उड्डाणे नियमित सुरू झाल्याने  भारतीय नागरिक, पर्यटक व प्रवासी भारतात येण्यासाठी आवश्यकतेनुसार थेट तिकीट आरक्षित करू शकतात, असे परराष्ट्र मंत्रालयाच्यावतीने कळविण्यात आले  आहे.

आखाती विविध देशात अडकलेल्या प्रवाशांना याबाबत सहाय्य व अधिक माहितीसाठी असल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावास अथवा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयास संपर्क साधावा, याबाबत माहिती महाराष्ट्र शासनाच्या  राज्य आपत्तकालीन कार्य केंद्राच्या (SEOC)वतीने देण्यात आली आहे.

०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp