Pune | Wed, 18 February 2026

Ad

दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू

Sunil Goyal | 41 views
दिल्लीतील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदी हेमराज बागुल रुजू

नवी दिल्ली, दि. ३ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्राच्या संचालकपदाचा कार्यभार संचालक हेमराज बागुल यांनी नुकताच स्वीकारला.

नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला यांनी संचालक बागुल यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी मनिषा पिंगळे यावेळी उपस्थित होत्या.

संचालक बागुल महासंचालनालयातील ज्येष्ठ संचालक असून ते मंत्रालयातील मुख्यालयात संचालक (प्रशासन) या पदावर कार्यरत होते. त्यांनी यापूर्वी मुख्यमंत्र्यांचे मुख्य जनसंपर्क अधिकारी तसेच महासंचालनालयाच्या नागपूर-अमरावती विभाग आणि छत्रपती संभाजीनगर – लातूर विभागाच्या संचालकपदाची जबाबदारी सांभाळली आहे. शासकीय सेवेत येण्यापूर्वी बागुल यांनी पत्रकारितेत उल्लेखनीय योगदान दिले आहे. तसेच साहित्यविषयक विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनीही बागुल यांना सन्मानित करण्यात आले आहे.

०००

महाराष्ट्र परिचय केंद्र /नवी दिल्ली

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp