
मुंबई, दि. ६: जागतिक आरोग्य दिनानिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची सिकलसेल ॲनिमिया या विषयावर आधारित विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे.
‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार दि. 7 एप्रिल 2026 रोजी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर रात्री 8.00 वाजता प्रसारित होणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही मुलाखत पाहता येईल. निवेदक उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
जागतिक आरोग्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याबाबत जागरूकता वाढविणे आणि सिकलसेल आणि ॲनिमियासारख्या आजारांविषयी माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासनस्तरावर सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. सिकलसेल ॲनिमिया हा एक अनुवांशिक रक्तविकार असून त्याचा परिणाम प्रामुख्याने आदिवासी व दुर्गम भागांमध्ये अधिक प्रमाणात आढळतो. या आजाराबाबत जनजागृती, वेळेवर तपासणी आणि योग्य उपचार घेणे महत्वाचे आहे. त्याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून डॉ. कंदेवाड यांनी सिकलसेल तपासणीचे महत्त्व, रुग्ण व वाहकांची ओळख, गर्भावस्थेतील तपासणी तसेच शासनामार्फत उपलब्ध असलेल्या मोफत तपासणी व उपचार सुविधांविषयी सविस्तर माहिती दिली आहे.
समाजमाध्यमांचे दुवे –
X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR
Facebook: https://www.facebook.com/MahaDGIPR
YouTube: https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR
०००
जयश्री कोल्हे/स.सं.
