Pune | Mon, 01 June 2026

Ad

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

Sunil Goyal | 5 views
महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेच्या अध्यक्षांना एक वर्षाची मुदतवाढ

मुंबई, दि. २९: राज्यातील उच्च शिक्षण, शैक्षणिक संशोधन, नवोपक्रम आणि धोरणात्मक शैक्षणिक उपक्रमांना चालना देण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) स्थापन करण्यात आली आहे. परिषदेच्या प्रभावी व सातत्यपूर्ण कामकाजाच्या दृष्टीने शासनाने परिषदेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असलेले डॉ. रवींद्र कुलकर्णी यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

यापूर्वी शासनाने मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांची एका वर्षाच्या कालावधीसाठी अध्यक्षपदी नियुक्ती केली होती.

महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (महासार्क) राज्यातील उच्च शिक्षण क्षेत्रातील गुणवत्ता वृद्धी, संशोधनाला प्रोत्साहन, नवोपक्रमांना चालना, शैक्षणिक संस्थांमधील समन्वय आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी २०२०) प्रभावीपणे राबविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असणार आहे. परिषदेच्या माध्यमातून राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालये आणि संशोधन संस्थांमध्ये शैक्षणिक उत्कृष्टता व संशोधन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

००००

काशीबाई थोरात/विसंअ

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp