Pune | Mon, 01 June 2026

Ad

महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्ती निमित्ताने  निरोप

Sunil Goyal | 5 views
महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त आर. विमला यांना सेवानिवृत्ती निमित्ताने  निरोप

नवी दिल्ली, ३१: महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त तथा सचिव आर. विमला  ३३ वर्षांच्या सेवेनंतर आज निवृत्त झाल्या.  नवी दिल्लीतील नवीन महाराष्ट्र सदनात आयोजित एका विशेष  समारंभात त्यांना निरोप देण्यात आला.

या कार्यक्रमाला राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र परिचय केंद्राचे संचालक हेमराज बागुल, सहायक निवासी आयुक्त नितीन शेंडे, सहायक निवासी आयुक्त स्मिता शेलार, जनसंपर्क अधिकारी मनीषा पिंगळे, तसेच हरियाणा राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्य डॉ. सुमेधा कटारिया ( निवृत्त आयएएएस) प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थित होत्या.

या समारंभादरम्यान उपस्थित मान्यवरांनी आर. विमला यांच्या तीन दशकांहून अधिक काळ केलेली प्रशासकीय सेवा, लोकाभिमुखता आणि उपक्रमशीलतेचा गौरव केला. नवी दिल्लीत राज्याचे प्रतिनिधित्व करताना महाराष्ट्र सदनच्या माध्यमातून राज्याची प्रतिमा उंचावण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याचे प्रशंसोद्गार यावेळी मान्यवरांनी काढले.

या निरोप समारंभाला महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय केंद्राचे सर्व वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी  उपस्थित होते. त्यांनी आर. विमला यांना त्यांच्या पुढील  वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

0000000

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp