
नाशिक, दि.५ एप्रिल (जिमाका वृत्तसेवा): मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आज ओझर विमानतळावर आगमन झाले. जिल्हा प्रशासनाच्यावतीने विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी मुख्यमंत्री महोदयांचे स्वागत केले.
यावेळी आमदार ॲड राहुल ढिकले, महापौर हिमगौरी आडके-आहेर, विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, महानगर पालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, निफाडचे उपविभागीय अधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार विशाल नाईकवाडे आदी उपस्थित होते.
00000
