
सोलापूर,दि. ६ (जिमाका) : सोलापूर महानगरपालिकेच्या कोटणीस कॉम्प्लेक्स इमारतीतील अंतर्गत सोयी-सुविधांच्या नूतनीकरण कामाचे भूमिपूजन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडले. नूतनीकरण अंतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची माहिती घेऊन ही कामे विहित वेळेत व दर्जेदार झाली पाहिजेत, असे मंत्री गोरे यांनी यावेळी सूचित केले.

यावेळी आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, नगरसेविका रोहिणी तडवळकर यांच्यासह अन्य मान्यवर, अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

या कामासाठी जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत ₹2.35 कोटी निधी मंजूर करण्यात आला असून कामाचा कालावधी 8 महिने एवढा निश्चित करण्यात आला आहे.
०००
