
मुंबई,दि.२७ : महाराष्ट्र राज्य लॉटरीतर्फे प्रत्येक महिन्यात ५ मासिक व ६ भव्यतम सोडती तसेच साप्ताहिक सोडती काढल्या जातात. एप्रिल २०२६ मध्ये ११ एप्रिल रोजी महाराष्ट्र सह्याद्री, १५ एप्रिल रोजी महाराष्ट्र गौरव, २१ एप्रिल रोजी महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन विशेष, २५ एप्रिल रोजी महाराष्ट्र तेजस्विनी व २९ एप्रिल रोजी महाराष्ट्र गजराज या मासिक सोडती काढण्यात आल्याचे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळवले आहे.
एप्रिल-२०२६ मध्ये मासिक व भव्यतम सोडतीतून ९३४४ तिकिटांना रू. २६,६६,५५०/- व साप्ताहिक सोडतीतून ५२,०१५/- तिकिटांना रू. १,७१,३९,०००/- ची बक्षिसे जाहीर झाली आहेत. तसेच महा. सागरलक्ष्मी ते महाराष्ट्रलक्ष्मी या साप्ताहिक सोडतीमधून रक्कम रू. ७ लाखाची प्रथम क्रमांकाची एकूण ८ बक्षिसे जाहीर झाली आहेत.
महाराष्ट्र गणेशलक्ष्मी वर्धापन दिन या मासिक सोडतीमधून जीएस-08/3660 या श्री. गणेश एन्टरप्रायजेस, दादर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.२१ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
महाराष्ट्र गजराज या मासिक सोडतीमधून जीजे-01/1914 या महावीर लॉटरी सेंटर, कोल्हापूर यांचेकडून विक्री झालेल्या तिकिटास रक्कम रु.९ लाखाचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस जाहीर झाले आहे.
सर्व खरेदीदारांनी महाराष्ट्र राज्य लॉटरीच्या वेबसाईटवर नमूद प्रक्रिया पूर्ण करून रक्कम १०,०००/- वरील बक्षिसाची मागणी या कार्यालयाकडे सादर करावी. रक्कम रू. १०,०००/- च्या आतील बक्षिस रकमेची मागणी विक्रेत्यांकडून करण्यात यावी, असे उपसंचालक (वित्त व लेखा), महाराष्ट्र राज्य लॉटरी, वाशी यांनी कळवले आहे.
00000
वंदना थोरात/विसंअ
