Pune | Mon, 01 June 2026

Ad

राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

Sunil Goyal | 6 views
राज्यपालांकडून अधिकारी, कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा

मुंबई, दि. २१ : राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दहशतवाद विरोधी दिनानिमित्त लोकभवनातील अधिकारी व कर्मचारी यांना दहशतवाद विरोधी प्रतिज्ञा दिली.

अहिंसा व सहिष्णुतेच्या परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व हिंसाचाराचा सर्वशक्तीनिशी मुकाबला करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा स्मृतिदिन दहशतवाद विरोधी दिवस म्हणून पाळण्यात येतो.

राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सहसचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे यांसह लोकभवनातील कर्मचारी व अधिकारी तसेच पोलीस अधिकारी व अंमलदार यावेळी उपस्थित होते.
०००

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp