Pune | Wed, 18 March 2026

Ad

‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा २३ सप्टेंबर रोजी विशेष संवाद

Sunil Goyal | 14 views
‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या विषयावर ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांचा २३ सप्टेंबर रोजी विशेष संवाद

मुंबई, दि. १९ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘जय महाराष्ट्र’कार्यक्रमाच्या भाग -२ मध्ये राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष तसेच मुख्यमंत्री पर्यावरण व शाश्वत विकास कृती समितीचे कार्यकारी अध्यक्ष पाशा पटेल यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीतून ते ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’या विषयावर सविस्तर संवाद साधणार आहेत.

‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, दि. २३ सप्टेंबर २०२५ रोजी रात्री ८.०० वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर पाहता येणार आहे. तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत या समाजमाध्यमांवर देखील उपलब्ध होईल. ही मुलाखत निवेदक डॉ. मृण्मयी भजक यांनी घेतली आहे.

X (Twitter): https://twitter.com/MahaDGIPR

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR

आंतरराष्ट्रीय बांबू दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाच्या “महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन”(MITRA) व फिनिक्स फाऊंडेशनच्या वतीने यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईं येथे ‘बांबू परिषदेचे’आयोजन करण्यात आले. या परिषदेमध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञ, अभ्यासक व उद्योजकांनी सहभाग नोंदविला. बांबूच्या उपयोगाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका अशा विविध विषयांवरील चर्चासत्रांच्या माध्यमातून यावेळी संवाद साधण्यात आला. त्याअनुषंगाने ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमाच्या भाग-२ मध्ये हवामान बदलाशी लढण्यासाठी बांबूचा उपयोग, शेतकऱ्यांसाठी उत्पन्नाचा फायदेशीर आणि शाश्वत स्रोत तसेच बांबूपासून निर्माण होणारे विविध पिकांचे इंधन आदी विषयावर अध्यक्ष पाशा पटेल यांनी सविस्तर माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp