
बीड,दि. २३ (जिमाका): बीड जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने सिंदफणा नदीला पूर आला आहे. या नदीचे पाणी बऱ्याच भागांमध्ये शिरले असून बीड तालुक्यातील नांदूर हवेली गावात देखील नदीचे पाणी घुसल्याने अनेक नागरिक पाण्यामध्ये अडकले होते. त्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन विभाग मंत्री गिरीश महाजन यांनी आज बीड तालुक्यातील नांदूर हवेली येथील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.

यावेळी श्री. महाजन यांनी नागरिकांशी संवाद साधुन, त्यांना तात्काळ मदत मिळण्यासाठी आश्वासित केले. पंचनामे करण्याचे काम सुरु आहे, परंतू शासनामार्फत पूरग्रस्त भागातील बाधीत नागरिक आणि शेतकऱ्यांना तात्काळ मदत पोहोचविण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन उपविभागीय अधिकारी कविता जाधव, तहसिलदार चंद्रकांत शेळके, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह नांदूर हवेली येथील गावकऱ्यांची उपस्थिती होती.
००००
