Pune | Sun, 15 February 2026

Ad

मुंबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवाबाबत बैठक

Sunil Goyal | 9 views
मुंबईमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवाबाबत बैठक

मुंबई, दि. १७ : मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सवाचे सर्वसमावेशक स्वरूप लक्षात घेऊन आयोजनाबाबत महसूल, पर्यटन, सांस्कृतिक कार्य, नगरविकास विभाग आणि महापालिका आयुक्त यांनी समन्वयाने या महोत्सवाची आखणी करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

Milind Kadam M4B

मुंबईमध्ये आंतरराष्ट्रीय लोकनृत्य महोत्सव आयोजित करण्यासंदर्भात मेघदूत येथे बैठक झाली. या बैठकीत पर्यटनमंत्री शंभूराज देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ. बी. एन. पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे, नृत्येश्वर फाउंडेशन ऑफ आर्ट कल्चर संस्थेचे शंशिकांत मेस्त्री उपस्थित होते.

पर्यटनमंत्री देसाई म्हणाले की, मे.नृत्येश्वर फाउंडेशन ऑफ आर्ट कल्चर या संस्थेद्वारे मुंबईत आंतरराष्ट्रीय दर्जाचा लोकनृत्य महोत्सव साजरा करण्याबाबत सर्व विभागांचा समावेश असणे आवश्यक आहे. त्यासाठी संबधित सर्व यंत्रणांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या महोत्सवासाठी निधीची तरतूद, विभागांचा यामधील सहभाग यादृष्टीने समन्वयाने नियोजन करण्याचे निर्देश पर्यटनमंत्री देसाई यांनी दिले.

०००

संध्या गरवारे/विसंअ/

आमच्यात सामील व्हा

Join WhatsApp